मुंबई : आज ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळामध्येही राज्याचं अर्थचक्र सुरु राहण्यासंदर्भात करण्यात आलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्याच्या वाटचालीसंदर्भात माहिती दिली.
आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोरोना कालावधीत महाराष्ट्राला सांभाळण्याचं काम सर्वांनी मिळून केल्याचं म्हणत सर्वांचे आभार मानले. तसेच सर्वांच्या सहकार्यानेच कठीण कालावधीतून आपल्याला वाटचाल करणं शक्य झाल्याचं प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
माझं कौतुक होत आहे की, या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये कसं नेतृत्व केलं; कसा महाराष्ट्र संभाळला. पण हे श्रेय आहे ते माझं एकट्याचं नाही. माझे मंत्रीमंडळातील सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी, सारे कर्मचारी अगदी सफाई कर्मचारी सुद्धा आणि साहजीकपणे आपल्या राज्यातील नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी दिलेली साथसोबत महत्वाची ठरली. तुम्ही जी साथ देत आहात ती त्यावेळेला दिली नसती तर हे कठीण होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं काैतुक केलं.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे, हेच माहित नाही, त्याला काय किंमत द्यायची”
नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन; म्हणाले…
भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू; विनायक राऊतांचा टोला
संजय राऊत संपादक पदाच्या लायकीचे नाहीत; नारायण राणेंचा हल्लाबोल