“देशाला 2014 पासून ग्रहण लागलंय, स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही असे लोक आज सत्तेत आहेत”

0
492

मुंबई : देशाला 2014 पासून ग्रहण लागलं असून ज्यांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही असे लोक सध्या सत्तेत आहेत. त्यांच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असून देशाचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या लोकांचं योगदान नाही आणि त्या विचारसरणीचे लोक आज सत्तेत बसले आहेत. मोठ्या कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य आणि लोकशाही मोडीत काढण्याचं काम सध्या करत आहेत. लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावं, असं नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्त काँग्रसेने स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

लोकल सुरू करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही- संजय राऊत

“ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचे नाही, त्यामुळे…”

काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा

पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो- महादेव जानकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here