इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; दोषींवर तत्काळ कारवाई- एकनाथ शिंदे

0
200

रायगड : महाड शहरातील काजळ पुरा परिसरात 5 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 19 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत 60 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. यावर नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाडमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. अजूनही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. दरम्यान या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत जखमी किंवा मृत व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारकडून योग्य ती मदत दिली जाईल. तसेच शहरात ज्या काही जुन्या इमारती आहेत. त्यांच्यासाठी क्लस्टर योजना आणली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची बाधा

तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती

परीक्षांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले…

मी फक्त बैलाची शिंगं पकडली; हसन मुश्रीफांचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here