मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अॅक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही. त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले गेले नाहीत. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठीत करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते असेही ते म्हणाले.
ही समिती या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही. कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Now the question remains how will a retired judge without power enquire against a sitting Home Minister ❓
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 31, 2021
Constitution of Hon Justice K. U. Chandiwal Committee for probing the allegations against HM Anil Deshmukh, is just of committee nature and not as a judicial commission.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 31, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“महाविकासआघाडीचे नेते फक्त पैसा कमवायच्या मागे, मुख्यमंत्री कशातच लक्ष घालत नाहीत”
मोठी बातमी! मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
2 एप्रिलपासून मर्यादित लाॅकडाऊनची शक्यता; पहा काय असणार नियम
फक्त किस्से मोठे आहेत, पण मन खूप लहान; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका