Home महाराष्ट्र माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत-...

माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत- प्रवीण दरेकर

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण त्यांच्या कुटुंबालाही ते सुरक्षित ठेवू शकले नाहीत. कारण सरकार संभ्रमावस्थेत आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

आम्ही रस्त्यावर उतरूच. तुम्ही मातोश्रीत बसून होतात. त्याकाळातही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो. पण तुम्ही लोकांमध्ये जा आणि लॉकडाऊनमुळे होणारं त्यांचं नुकसान समजून घ्या, असा सल्लाही दरेकरांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मोदी सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली हे फडणवीसांनी सांगायला हवं”

उद्धव ठाकरेजी थोडा अभ्यास करत जा; चंद्रकांत पाटलांचा टोला

“मोठी बातमी! शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर