“मुख्यमंत्री महोदयांनी ‘ही’ घटना डोळ्यांसमोर आणावी, म्हणजे राठोड सारख्या नराधम्याचा राजीनामा घेणं सोपं होईल “

0
199

मुंबई : मला आताही विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील, असं म्हणत ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील, असा विश्वास भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्या ‘टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

शिवाजी महाराजांनी महिलेवर अत्याचार केलेल्या पाटलाचे हातपाय तोडले होते. मुख्यमंत्री महोदयांनी ही घटना डोळ्यांसमोर आणावी. म्हणजे या संजय राठोड सारख्या नराधम्याचा राजीनामा घेणं त्यांना नक्कीच सुलभ होईल, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते. त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राठोड यांची अडचण वाढण्याची शक्यता; पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल

ठाकरे सरकारकडून बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरु- नारायण राणे

पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं राज्य सरकार विचारले ‘हे’ 14 प्रश्न

महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here