आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! बीडच्या घटनेत थेट नेत्यांचा हात?; फडणवीसांचा खळबळजनक दावा
‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. बैठक संपल्यानंतर जयंत पाटील बाहेर आले. त्यावेळी त्यांना बैठकीत काय चर्चा झाली? काय ठरलं? असं विचारण्यात आलं. “काहीही घडलेलं नाही, आहे तीच परिस्थिती आहे.
फक्त शांतता राखा, उपोषण मागे घ्या हा ठराव एकमुखाने या सर्वपक्षीय बैठकीत झाला” असं जयंत पाटील म्हणाले. कुणबीमधून मराठा समाजाला ससकट आरक्षण देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याच जयंत पाटील म्हणाले. आरक्षणासाठी आयोग काम करतोय, असं जयंत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
पुण्यातील नवले ब्रीजवर आंदोलकांचं टायर जाळून रस्ता रोको
मराठा आंदोलनाला हिंसक वळण; माजलगाव नगरपरिषद फोडली
मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदारानंतर आता अजित पवार गटातील ‘हा’ आमदार देणार राजीनामा?