आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार टिकून राहण्यास आणि चांगले काम करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव एक प्रमुख कारण आहे. सर्वांना समजून घेऊन चालणारे ते व्यक्तिमत्त्व असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले. ते आनंद मेळाव्यात बोलत होते.
“महाविकास आघाडीचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. हे सरकार पाडण्यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहे. काही जण स्वप्नात बडबडत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार नाही. आघाडीचे सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा मोठा वाटा आहे, हे मान्यच करावे लागेल. सर्वांना समजून घेत, सोबत घेऊन चालणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेच आघाडी टिकण्यासाठी हातभार लागला आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
हे ही वाचा : रामदास आठवले वानखेडेंच्या पाठीशी उभे असतील तर, याहून दूर्देवी काही असू शकत नाही- नवाब मलिक
दरम्यान, अनेक संकटे आली, मात्र सरकार डगमगले नाही. कोरोनाकाळात मुख्यमंत्री ठाकरे यांचे काम देशात एक नंबरचे ठरले. कोणतीही लपवाछपवी न करता त्यांनी काम केले. ज्यांनी लपवाछपवी केली, ते उघडे पडले. एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे मुख्यमंत्री सर्वांची काळजी घेतात. त्यामुळेच एकीकडे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या जात असताना महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांसह सर्व घटकांची काळजी घेतली जात आहे.” महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे चालले आहे. पुढील तीन वर्षेदेखील चालणार आहे. आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून पुन्हा निवडून येऊ, असंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेने नंतर आता राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; माथेरानचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत
पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; सुप्रिया सुळेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग
“शिवसेना यंदा साजरी करणार भगवी दिवाळी; औरंगाबादमध्ये 50 हजार घरांवर फडकवणार भगवा”