कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण दौरा केला, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
भाजप नेते गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं. त्याअगोदर ते घरात बसून होते. त्यावेळी त्यांना घराच्या बाहेर पडावसं वाटलं नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चक्रीवादळाने नुकसान झालेल्या घरांची, शेतीची पाहणी करण्यासाठी पहिल्यांदा भाजप नेते पोहचले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा केला आणि आता शरद पवार करायला निघाले आहेत, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि पवारांना लक्ष्य केलं.
दरम्यान, नुकसान भरपाईत एकरी किंवा हेक्टरी नुकसान भरपाई देऊन चालणार नाही. ती प्रति झाड द्यावी लागेल. कारण त्या प्रत्येक झाडांचं 10 वर्षांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे 100 कोटी किंवा 200 कोटी ही तुटपुंजी रक्कम आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत. विरोधी पक्ष काहीही बोलतो असं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
“कोरोनाची लढाई कशी लढावी ते महाराष्ट्रानं कर्नाटक आणि उत्तर प्रदेशाकडून शिकावं”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय?; मुख्यमंत्र्यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक
शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाला धोका दिला- राजनाथ सिंग
“कोरोना संसर्गाबाबत चीनचा मोठा खुलासा”