मुंबई : देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. राज्यात लस तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन देखील अपुरा पडत असल्याने वारंवार केंद्रकडे मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
आजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी 4 लाख करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही करोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच, शिवाय हतबलही झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना कोरोनाची ही स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. मोदी सरकार केवळ भाषण करणे, घोषणा करणे व वेळ काढूपणा करत आहे. केंद्र सरकार हे जाणून बुजून करत आहेत की त्यांना कामं करता येत नाही अशी शंका नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
राज्यांना ऑक्सिजन साठा निश्चित केल्यानंतरही दिला जात नसल्याची सत्यपरिस्थिती आहे. दोन दिवसापासून कर्नाटकच्या प्लांटमधून येणारा 50 टँकचा कोटा राज्याला मिळेनासा झाला आहे. रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत वितरीत करता येत नाही. लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाही. शिवाय राज्यसरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस नाही.” असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना कोरोनाची ही स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. मोदी सरकार केवळ भाषण करणे, घोषणा करणे व वेळ काढूपणा करत आहे. केंद्र सरकार हे जाणून बुजून करत आहेत की त्यांना कामं करता येत नाही अशी शंका @nawabmalikncp यांनी व्यक्त केली आहे. pic.twitter.com/OKCdyBujgU
— NCP (@NCPspeaks) May 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“कोविड सेंटरवर शिवसेना-भाजपच्या महिला नेत्यांची धक्काबुक्की”
“मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या”
“सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असं म्हणण्याची वेळ आली”
ठाकरे सरकार, निकम्मा कारभार; नाशिक व्हेंटिलेटर प्रकरणावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल