आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने राज्य सरकारवर टीका करण्यास सुरु केली आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका ही भाजप नेत्यांकडून केली जाते. याला आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा मोठं नुकसान केलंय. ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची पाळी आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आलीये. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार कुठे कमी पडणार नाही मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : रोहित आणि हार्दिक यांच्यासोबत धनंजय मुंडेंचीही तुफान बॅटिंग, म्हणाले…
फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपीमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.
महत्वाच्या घडामोडी –
‘…नाही तर गुन्हा दाखल करू’; शिवसेनेचा भाजप आमदाराला इशारा
“3 महिन्यात 20 हजार बांधकाम कसे पाडणार?; निवडणूकीचा टार्गेट तर पूर्ण करायचं तर नाही ना”
चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका