Home पुणे केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाहीत, लोकं सांगतात अन्…;प्रकाश आंबेडकर

केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाहीत, लोकं सांगतात अन्…;प्रकाश आंबेडकर

पुणे : केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाही. लोकं सांगतात आणि शासन निर्णय घेते. सरकार केवळ आदेश काढण्याचे काम करत आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन असता तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडलो असतो. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काहीच प्लॅन नाही. कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, हे शासन ठरवतच नाही. लोकांनी सांगितल्यावर सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

1 जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचे आम्ही मानतो. जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या दिवसाचे महत्व कायम राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

2020 नं खूप काही शिकवलं- उपमुख्यमंत्री अजित पवार

“कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार”

“मुख्यमंत्री महोदय, आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे भाषणात नाही तर कृतीत दिसू द्या”

पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे असतो, पण…; मेहबूब शेख प्रकरणावर रोहित पवारांचं भाष्य