एकनाथ खडसे आणि पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल- चंद्रकांत पाटील

0
192

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणूक जाहीर केली आहे. भाजपने आपले 4 उमेदवार घोषित केलं. दिग्गजांना डावलून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

उमेदवारीबाबत केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे. चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत हे तिघेही समजूतदार असतील, ते स्वतःच स्वतःला समजावून सांगतील,असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवार घोषित केले कारण आमची ताकद आहे. चौथा उमेदवार हा आमचा अधिकार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

विधान परिषद उमेदवारांच्या निवडीवर खडसेंनी सोडलं मौन; म्हणाले…

मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलंय त्यांना काही फरक पडणार नाही- निलेश राणे

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत; उद्धव ठाकरेंची घोषणा

औरंगाबादमध्ये 16 मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here