मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनीलाँडरींग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे., असं ट्विट करत सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता”
“मोठी बातमी! अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल”
संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही; निलेश राणेंचा हल्लाबोल
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय- एकनाथ खडसे