निकोलस पूरन-ग्लेन मैक्सवेलची शानदार फलंदाजी; पंजाबची दिल्लीवर 5 विकेट्सनी मात

0
192

दुबई : आजच्या आयपीएलचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला.

दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 167 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने परत एकदा नाबाद शतक ठोकले. शिखर धवनने 61 चेंडूंचा सामना करताना नाबाद 106 धावा ठोकल्या. ज्यात त्याने 12 चाैकार व 3 षटकार मारले. तर पंजाबकडून मोहम्मद शमीने 2, तर ग्लेन मैक्सवेल, जेम्स नीशम व मुरूगन अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना पंजाबने हे लक्ष्य 19 व्या षटकात पूर्ण केले. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 28 चेंडूत 53 धावा केल्या. तर ख्रिस गेलने 13 चेंडूत 29 धावा आणि ग्लेन मैक्सवेलने 24 चेंडूत 32 धावा केल्या. तर दिल्लीकडून कगिसो रबाडाने 2, तर अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

दुर्गा अष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन अटळ; पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा

पंतप्रधानांनी देश विकायला काढलाय ; प्रकाश आंबेडकरांची नरेंद्र मोदींवर टीका

शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, त्यामुळे…; पंकजा मुंडेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही; पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here