आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजानी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवरून आज भाजपातर्फे राज्यातील एक हजार ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा करत असलेले आंदोलन ही नौटंकी आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधाला आहे.
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने आणि आरक्षणाबाबत तत्कालीन फडणवीस सरकारने परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्राच नाही, तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद मोदींच्याविरोधात आंदोलन करावं, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी परिपत्रक काढून जि.प. निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त राज्य नाही तर देशातील OBC चे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे
त्यामुळे भाजप नेत्यांनी @narendramodi यांच्या विरोधात आंदोलन करावे.— Nana Patole (@NANA_PATOLE) September 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली आहे का?; चित्रा वाघ यांचा सवाल
आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला; गोपीचंद पडळकरांची टीका
माफी मागा, अन्यथा…; सुरेखा पुणेकरांचा प्रविण दरेकरांना इशारा
“सांगलीतील महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतील कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक”