Home महाराष्ट्र भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर, काही नेते माझ्या संपर्कात; नाना पटोलेंचा दावा

भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर, काही नेते माझ्या संपर्कात; नाना पटोलेंचा दावा

मुंबई : भाजप सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. तसेच काही नेते माझ्या संपर्कात आहेत., असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होेते.

राज्यपालांनी विधानपरिषेदत महाविकासआघाडीच्या 12 आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील, अशी भीती आहे. भाजप पक्ष सध्या या फुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळेच राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात करण्यात आलं, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

जेंव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे, तेंव्हापासून भाजपाकडून सातत्याने हे वक्तव्य करण्यात येतं की, आठ दिवसांत आम्ही मंत्रिमंडळ बदलू, सत्तेत येऊ. पण हे करता करता आता दोन वर्षे पूर्ण होत आली. आणि आता भाजपामध्ये खूप चलबिचल सुरू झाली आहे. भाजपाचे अनेक नेते, आमदार माझ्या संपर्कात आहेत. दुसऱ्याही पक्षाचे असतील. म्हणून हे बारा आमदार ज्यादिवशी या महाविकास आघाडीचे होतील, त्या दिवशी पक्ष फुटेल याची भीती त्यांच्या मनात आहे त्यामुळे राज्यपालांकडून 12 आमदारांची नियुक्ती टाळण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. आणि स्वतःचं पक्ष वाचवण्यासाठी भाजप अनेकांवर अन्याय करत आहे, असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”

“अफगाणिस्तान हादरलं! काबूल विमानतळावर 2 मोठे बाॅम्बस्फोट”

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेनं मारण्याची भाषा केली; संजय राऊतांनी केला खुलासा