Home महाराष्ट्र “पराभवाच्या धक्क्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झालेत, म्हणूनच तर त्यांना गावगुंड व पंतप्रधानांमधला...

“पराभवाच्या धक्क्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झालेत, म्हणूनच तर त्यांना गावगुंड व पंतप्रधानांमधला फरक कळत नाहीये”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असं वादग्रस्त वक्तव्य केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आता या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला होता. यावरून आता नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर त्यानंतरही भाजप नेत्यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला होता.

नाना पटोले यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरून आता नाना पटोलेंनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

राज्यातील भाजपचे नेते एका गावगुंडाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संबंध जोडून त्यांची बदनामी करत आहेत. राज्यातील भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक समजेनासा झाला आहे. त्यांना उपचाराची जास्त गरज आहे, असा टोला नाना पटोलेंनी यावेळी लगावला.

हे ही वाचा : ‘…तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी’; संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक

दरम्यान, मी एका गावगुंडाबद्दल बोललो होतो, त्या गावगुंडाने प्रसारमाध्यमासमोर येऊन सर्व सांगितलं आहे. तसेच तो गावगुंड जे बोलला ते मी माध्यमांना सांगितले. मी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कोणताही अपशब्द वापरलेला नाही., असं पटोले म्हणाले. तसेच माझे मानसिक संतुल बिघडले आहे असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचेच खरे तर मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. नगरपालिका निवडणुकीत विदर्भात काँग्रेसने भाजपला धूळ चारली आहे. भाजपचा आम्ही पराभव केला आहे. त्यामुळे त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. या धक्क्यातून ते सावरलेले दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक कळत नाही. त्यांना उपचाराची जास्त गरज आहे, असा प्रतिटोला नाना पटोलेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“मिरच्या झोंबल्या, बांबू लागला, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना?”

“रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादीने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

शरद पवारांना कोरोणाची लागण; पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार