आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : जलयुक्त शिवार योजनेत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चिट दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र अशी कोणतीही क्लीन चिट देण्यात आली नसल्याचं राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले. अशातच शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
भाजपा हे एक अजबच रसायन आहे. हे लोक आपल्या राजकीय विरोधकांवर बेफाम आरोप करत सुटतात. हवा तसा चिखल उडवतात. तक्रारदारही तेच व फौजदारही तेच असतात. दुसऱ्यांना बाजू मांडण्याची ते संधीच देत नाहीत. त्याच वेळी स्वतःवर जे आरोप पुराव्यांसह होत आहेत त्याबाबत ते स्वतःच स्वतःला क्लीनचिट देत सुटले आहेत. यास काय म्हणावे ? असा खोसच सवाल अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरुच; अहमदनगरमधील ‘या’ मोठ्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्ट व्यवहारास क्लीन चिट मिळाली असून फडणवीस सरकारचे याबाबत गंगास्नान झाल्याचा डंका भाजपच्या गोटातून पिटला जात आहे. भाजपतर्फे समाज माध्यमांवर तशी ठोकून खोटी माहिती पसरवण्यात आली. प्रसिद्धी माध्यमांची दिशाभूल करुन हे क्लीन चिट प्रकरण रंगवण्यात आले, पण शेवटी सरकारतर्फेच या कट-कारस्थानाचा बुरखा उडवण्यात आला. जलयुक्त शिवाराला कोणत्या प्रकारची क्लीन चिट देण्यात आली नाही, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, यावर आता सरकार खोटो बोलते आहे व आम्ही गंगास्नान करुन पापकर्मे धुवून टाकली आहेत, असे जलयुक्त शिवाराची भ्रष्ट डबकी करणाऱ्यांना म्हणायचे आहे काय. पुन्हा आजही हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी करुन गंगा शुद्धीकरण मोहिमेची स्थिती जल शिवार योजनेसारखी झाली आहे, असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
हे सरकार फक्त एकाचं विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे…; चित्रा वाघ यांची टीका
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे; राज्य सरकारकडून ‘या’ महत्वाच्या मागण्या मान्य