Home महाराष्ट्र दूध दर आंदोलनाला सुरुवात; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडला दुधाचा टँकर

दूध दर आंदोलनाला सुरुवात; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडला दुधाचा टँकर

सांगली : दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. ठिकठिकाणी सुरुवात झाली असून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्रता पहायला मिळत आहे.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला असून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडलं. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ कार्यकर्त्यांनी गोकूळ दूध संघाचा टँकर फोडला. हा टँकर कोल्हापूर येथून मुंबईच्या दिशेने जात होता.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

.. तर कंगना रानौतने कलाविश्व सोडावं- करण जोहर

राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

पवार साहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? : निलेश राणेंचा सवाल

राजू शेट्टी यांचं दूध दराचे आंदोलन म्हणजे…; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर निशाणा