Home महाराष्ट्र काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला झालेली अटक बेकायदेशीर; महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय...

काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला झालेली अटक बेकायदेशीर; महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील यांचा भाजपवर आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधानांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : राज ठाकरे, सभेला घातलेल्या अटी पाळणार का?; बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

धनंजय पाटील यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र लिहिलं आहे.

प्रति,
माननीय जिल्हाधिकारी,

माननीय महोदय,
गुजरात मधील काँग्रेस पक्षाचे लढवय्ये आमदार श्री जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधानाच्या नावाने काही अपेक्षा करणारे ट्विट केल्याप्रकरणी पालमपुर सर्किट हाऊस मधून बुधवार दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना बेकायदेशीरपणे अटक करून आसामला घेऊन गेले. आसाम मध्ये त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून श्री जिग्नेश मेवाणी यांना पोलिस कोठडीत पाठविण्यात आले. या बाबीचा निषेध करीत असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने देशाच्या पंतप्रधान च्याविरोधात किंवा त्यांच्या कडून काही अपेक्षा व्यक्त केली हा गुन्हा ठरू शकत नाही ,लोकशाही व संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मनमानीपणे सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून आमदार श्री जिग्नेश मेवाणी यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे ही अटक बेकायदेशीर असून लोकशाही मूल्यांचा पायमल्ली करणारी आहे. आ. जिग्नेश मेवाणी यांना त्वरित आसाम सरकार कडून सुटका झाली पाहिजे व त्यांच्या वर केलेली कारवाई मागे घेतली पाहिजे., अशी मागणी धनंजय पाटील यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“कोणी योगी आहे, तर कोणी…; जितेंद्र आव्हाडांची टीका नेमकी कोणावर?; राज ठाकरेंवर की अमृता फडणवीसांवर?”

सत्तेसाठी यू – टर्न; भोंग्याच्या निर्णयावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्या ठाकरे सरकार विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार- किरीट सोमय्या