मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, या मागणीसाठी भाजपनं आज मुंबईत जोरदार आंदोलन केलं.
कांदिवलीमध्ये आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात रेलभरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन मोडित काढलं आणि भातखळकर यांच्यासह 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांना अटक केली.
पत्रकार, वकील यांना सुद्धा लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा 24 तासाच्या आत राज्य सरकारने लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अन्यथा लहरी, तानाशाही व तुघलकी ठाकरे सरकारच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा भातखळकर यांनी दिला. तसेच लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार. लोकांची परवड करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो…, असा हल्लाबोलही भातखळकरांनी यावेळी केला.
लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार. लोकांची परवड करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो… pic.twitter.com/gwQfIWRKzR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“माझ्या मनातील प्रश्न मी राज ठाकरेंसमोर मांडले, युतीचा कोणताही प्रस्ताव भेटीत मांडला नाही”
भविष्यात मनसे-भाजप एकत्र येणार असेल तर आनंदच आहे- बाळा नांदगावकर
राज ठाकरे – चंद्रकांत पाटील भेट; राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण
“सरकार चालवताय की दाऊदची गँग?”; आशिष शेलारांचा सवाल