पुण्यातील गोपाळकृष्ण विद्यामंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शाळेत मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि मुलांचा मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी विविध शैक्षणिक , सामाजिक उपक्रम राबविले जातात. बालवयात विविध मूल्यांची बीजे पेरली जातात. म्हणून शाळा हे मुलांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्रबिंदू असल्याचे मत पुणे जिल्हा प्राथमिक विभागाचे वेतन व भ. नि.नि. पथक अधीक्षक संजय गंभीरे यांनी गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलताना मांडले.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, पत्नी अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध नृत्याविष्कार, एकांकिका, नाटिका, पोवाडा, बालगीते,लावणी अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी होती. यावेळी शाळेतील चिमुकल्यांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तत्पूर्वी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पुणे जिल्हा प्राथमिक व माध्यमिक विभागाचे वेतन व भ. नि.नि. पथक अधीक्षक संजय गंभीरे, पत्रकार ज्ञानेश्वर मोरे, पत्रकार समाधान काटे, पत्रकार लक्ष्मण जाधव, बबनराव अम्रुळे आदी मान्यवर अतिथी म्हणून लाभले.

सदर कार्यक्रमाची आखणी आणि नियोजन उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले. उपस्थितांचे आभार विशाल चव्हाण यांनी मानले. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गीतांजली कांबळे आणि मंदाकिनी बलकवडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग ,शाळेचे माजी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कुठे व किती वाजता? वाचा सविस्तर

अटीतटित झालेल्या कर्जत जामखेडमध्ये रोहीत पवारांनी “इतक्या” मतांनी बाजी

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार; ‘या’ दिवशी होणार शपथविधी, मोठी अपडेट समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here