पुणे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी, असं म्हटलं होतं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातूनही सत्ताधारी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पण असं असलं तरी कायदा रद्द होणार नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेचं आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज गेला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भावनिक प्रतिक्रिया
दुसरा टी-20 सामना : भारताने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू माझ्या मागे लागलेत- असदुद्दीन ओवेसी
“मिरजेत तरूणाच्या डोक्यात दगड घालून निर्घूण खून”