Home महाराष्ट्र … तो वृक्ष वाचला, आदित्य ठाकरेंच्या पत्राची नितीन गडकरींनी घेतली दखल; दिले...

… तो वृक्ष वाचला, आदित्य ठाकरेंच्या पत्राची नितीन गडकरींनी घेतली दखल; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

मुंंबई : मिरज-पंढरपूर मार्गावरील भोसे गावातील 400 वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला होता. यासाठी आदित्य ठाकरे यांनी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. या विनंतीचा मान ठेवत नितीन गडकरी यांनी त्या संबंधात महत्वाचे आदेश दिले आहेत.

दुर्मिळ पक्ष्यांचं आश्रयस्थान आणि त्या परिसरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या वटवृक्षाचे जतन व्हावं. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन वटवृक्ष वाचवावा ही विनंती, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरी यांनी केली होती. नितीन गडकरी यांनी आदित्य यांच्या पत्राची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हिस रोडसाठी पर्यायी जागेचा विचार करावा, असे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी तात्काळ वटवृक्षाची पाहणी करण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाठवले. अधिकाऱ्यांनी पाहणी करून मुख्य महामार्गात वटवृक्षाचा अडथळा नाही, असं सांगितले असून सर्व्हिस रोडमध्ये वटवृक्ष स्थगित करून तेथील काम स्थगित करून पर्यायी जागेचा विचार करण्यात येईल. तसेच यासंबंधीचा अहवाल लवकरच केंद्रिय मंत्र्यांना पाठवण्यात येईल, असंही गडकरी यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

… तो वृक्ष वाचला, आदित्य ठाकरेंच्या पत्राची नितीन गडकरींनी घेतली दखल; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

“महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेलं राज्य बनविणार”

उदयनराजेंच म्हणणं बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांवर राजकारण करणं योग्य नाही- जयंत पाटील

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही”