आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर-राजे निंबाळकर यांची नियुक्ती”
नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली, त्याबद्दल राणेंचे आभार, असा उपरोधक टोला जयंत पाटलांनी राणेंना लगावला.
आतापर्यंत भाजपाच्या नेत्यांनी पाच-सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. हे मी समजू शकतो. त्याचबरोबर, त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असे वातावरण कायम ठेवावे लागते, असंही जयंत पाटलांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“संप आता लवकरच मिटणार?; एसटी कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सूरूवात”
शिवेंद्रराजे भोसलेंमुळंच माझा पराभव झाला; आमदार शशिकांत शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट
भाजपाने आमच्यासोबत मिळून राज्य करावे; संजय राऊतांची भाजपाला खुली ऑफर