“ठाण्याची श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलियाची ‘मिस इंडिया’!”

0
315

मुंबई/नवी दिल्ली : ठाण्यातील प्रसिद्ध डाॅक्टर संदीप माने यांची 20 वर्षीय कन्या श्रुतिका माने हिने ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया साैंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

श्रुतिकाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यानंतर ठाणे येथे आल्यानंतर सिंघानिया स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण घेतले. तसेच श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलियातील एडलेट विद्यापीठातून एडव्हान्स हेल्थ एन्ड मेडिकल सायन्स पदवीचे शिक्षण घेत आहे.

श्रुतिकाने कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिनं यश संपादन केलं आहे. 2001 साली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय वंशाचे राज सुरी यांनी मिस इंडिया साैंदर्य स्पर्धेला सुरूवात केली. तसेच श्रुतिका मुंबई येथे ऑक्टोबर 2021 रोजी होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधित्व करणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर

“सगळं नीट “ठरलंय” ना?…नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!”

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

“शिवसेनेला रोखण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपची काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here