“ठाकरेंचा शिंदेंना दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”

0
399

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 व अपक्ष 10 आमदारांसोबत बंड केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांचा शिंदे सरकारमध्ये जाण्याचा कल वाढला. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली. मात्र त्यानंतर आता ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सूरू झालं आहे.

अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा एकदा ठाकरे गटात घरवापसी केली आहे.

हे ही वाचा : पालघर जिल्ह्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी- ठाकरे गटाचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी व दिशा ग्रुपचे प्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी शिंदेंना धक्का देत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधलं. बैरीशेट्टी यांच्यासोबत यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवबंधन हाती बांधलं.  त्यामुळे शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“ठाकरेंना मोठा धक्का; आणखी एका खासदाराने शिंदे गटात केला प्रवेश”

“सुप्रिया सुळेनंतर, आता आदित्य ठाकरे, भारत जोडो यात्रेत आज राहुल गांधींसोबत चालणार”

संजय राऊत म्हणाले, शिवसेना बाळासाहेबांची, आता गुलाबराव पाटील म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here