Home महाराष्ट्र ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत झाली आहे-...

‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत झाली आहे- गोपीचंद पडळकर

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कोरोनामुक्त गाव  स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय.

“आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय”,असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

‘सगळं गावच करील तर सरकार काय करील? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल

शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही, या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचं नाही- गोपीचंद पडळकर

“मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही”

“आम्ही परीक्षा रद्द केल्या की विरोध, केंद्राने रद्द केल्या तर स्वागत…”