आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. ठाकरे गट-मनसे युती होणार, अशा चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलणार, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजप घरी चहा प्यायला आला तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत, पण…; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात औरंग्याची औलाद खपवून घेतली जाणार नाही; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
जयंत पाटील-अमित शहा यांची भेट झाली की नाही?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…