मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं होतं. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही असं वचन सरकारने दिलं होतं. ते सरकार पूर्ण करत आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल., असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना दोन हफ्त्यात मदत मिळणार आहे. पहिला हफ्ता 4700 कोटीचा असणार आहे., असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
Qualifier-1: दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
गोव्यात न्यूड फोटो शूट केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला अटक
“अखेर उद्धव ठाकरे यांनी एका किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकलं”
राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच; कोल्हापुरातील ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश