Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारच्या बुध्दीहिन भूमिकेने ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला”

“ठाकरे सरकारच्या बुध्दीहिन भूमिकेने ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा झटका दिलाय. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. यावरुन भाजप आमदार आशिष शेलार ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

‘ठाकरे सरकारने दृष्टीआहिन, बुध्दीहिन आणि दिशाहिन भूमिकेने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला’, असा गंभीर आरोप करताना ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जात असताना मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार मंत्रीमंडळात कसे राहू शकतात?, असा सवालही आशिष शेलार यांनी केलाय.

हे ही वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही; चंद्रकांत पाटलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे स्थानिक स्वाराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27 टक्केच आरक्षणाचा खून झाला. ज्या पद्धतीने 2019ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवडा देताना ट्रिपल टेस्टमध्ये खरा ठरणारा इंपेरिकल डाटा गोळा करा, असा आदेश दिला होता. मात्र, अहंकार आणि हेकेखोरपणा या सरकारने सोडला नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला सांगितले की, मागासवर्ग आयोग नेमा, इंपेरिकल डाटा गोळा करा, आरक्षणासाठी समथर्न कार्यपध्दीती करा. पण ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, असं वारंवार सांगत राहिले, अशी खोचक टीकाही शेलार यांनी यावेळी केलीय.

महत्वाच्या घडामोडी –

बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा, म्हणाले…

रोहित पाटलांच्या ’25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…

“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या घरी घेतला जेवणाचा आस्वाद”