ठाकरे सरकारकडून बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरु- नारायण राणे

0
152

सिंधुदुर्ग :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी  राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं गेलं आहे. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का? असा म्हणत आरोपांना उत्तरं द्या पळताय कशाला, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

सरकार विनयभंग, बलात्कार, हत्या प्रकरणातील लोकांना पाठीशी घालत आहे. सुशांतसिंग, दिशा सालियान, पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपींनाही पाठीशी घालत आहेत. या सरकारला तसं लायसन्स दिलं आहे का? असा सवालही नारायण राणे यांनी यावेळी केलाय.

महत्वाच्या घडामोडी –

पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं राज्य सरकार विचारले ‘हे’ 14 प्रश्न

महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत- आशिष शेलार

राज्यातील कोणताही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार- नारायण राणे

संजय राठोड याला चपलेनं झोडला पाहिजे- चित्रा वाघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here