Home महाराष्ट्र “ठाकरे सरकार हे सैतानी सरकार; मदत हवी असल्यास पवारांच्या घरी उपोषणाला बसावे...

“ठाकरे सरकार हे सैतानी सरकार; मदत हवी असल्यास पवारांच्या घरी उपोषणाला बसावे लागेल”

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच सरकारने दिवाळीपूर्वी दिलेले फसवे आश्वासन यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक पांचाळ यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर हे हिंगोलीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

तुम्हाला मदत हवी असेल तर अजित पवारांच्या घरी उपोषणाला बसावे लागेल. कारण तुम्ही माणसाला सत्ता दिली नाही, तर शैतानाला सत्ता दिली आहे., असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, आता जर या सैतानाला माणसात आणायचे असेल तर स्मशानभूमीतील साधुंकडे तुम्हाला जावे लागेल, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस यांनी उठाबशा काढू देत, आम्ही त्यांना चितपट करू; जयंत पाटलांचा टोला

“विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार”

राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला साथ दिली; उदयनराजेंकडून पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शैलीत शुभेच्छा

“आमचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हात लावाल तर राख व्हाल”