मुंबई : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे काही काळासाठी आपण सण-उत्सव बाजूला ठेवू, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याची परवानगी नाकारली आहे. यावरुन विधान परिषद विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडले आहे.
सण-उत्सवाची परंपरा कायम राखत कोरोनाच्या परिस्थितीची खबरदारी व काळजी घेत हा सण साजरा झाला पाहिजे. लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी द्यावी. असे झाले नाही तर हे सरकार हिंदू सणाच्या विरोधात आहे, असं लोकांचे मत तयार होईल, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
राज्यातील जनता मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने करत आहेत. महाराष्ट्रातील देवदैवत कुलुपात बंधिस्त आहेत. त्यामुळे मंदिराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद असून अशा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी का उघडली जात नाहीत? असा सवाल करत ठाकरे सरकारला सत्तेच्या लालसेपोटी हिंदू सणांचा विसर पडला आहे, अशी टीकाही प्रविण दरेकरांनी यावेळी केली .
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडी सरकार भूईसपाट होईल ; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
यंदाही दहीहंडीबाबत निर्बंध कायम; ठाकरे सरकारचे गोविंदा पथकांना आवाहन
महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
“नाना पटोले अडाणी भाषेत टीका करतात, मग रावसाहेब दानवेंनी केली तर मिरच्या का झोंबल्या?”