नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचे नाही. त्यामुळेच त्यांनी 50 टक्के मर्यादेचे नवे कारण शोधले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
इंदिरा सहानी केसमध्ये अतिशय क्लिअरपणे यावर भाष्य केले आहे. सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाही. तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे. एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचे हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केले नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
आतापर्यंत जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जात होतं.आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, असे ते म्हणाले. नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळकाढूपणा करत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्याचे अधिकार राज्याकडेच राहतील अशी आमची मागणी होती. याबद्दल आज अमित शहा यांची भेट घेतली. आज 127 व्या घटनादुरुस्तीचं महत्त्वाचं विधेयक मांडलं जाणार आहे. हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याची विनंती शहांना केली. परंतु विरोधक संसदेत गोंधळ घालत अनेक कामात अडथळे घालत आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा
पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो- महादेव जानकर
“दिल्लीत खलबतं सुरूच; देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”
रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की…; आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला