Home महाराष्ट्र समाजात तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओ पसरवू नका, नाहीतर…

समाजात तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओ पसरवू नका, नाहीतर…

मुंबई : राज्यात फोफावत असलेला कोरोना व्हायरस जात आणि धर्म पाहत नाही. त्यामुळे चुकीचे अथवा तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवू नका, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

करोनाशी दोन हात करताना अफवाचा आणखी एक व्हायरस समोर आला आहे. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणारच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, खोटे आणि चुकीचे, गैरसमज पसरवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले तर कायद्याच्या कचाट्यातून कुणीही सुटणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी-

अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; मरकजमधल्या प्रकारावर राज ठाकरे संतापले

…तर राज्य व देश अंधारात जाण्याची भिती; उर्जामंत्र्यांचा इशारा

“पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास 50 लाखांची मदत”

मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर- रुपाली चाकणकर