“दहावी, बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता; असा पाहू शकता निकाल”

0
312

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल हा mahresult.nic या अधिकृत वेबसाइट वर जाहीर केला जाईल.

दहावीचा निकाल 9 वी आणि 10 वीच्या घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थी आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीचं सांगितलं होतं.

राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केलं जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील. तसंच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

निकाल खालीलप्रमाणे पाहू शकता :

1.सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.
2.होम पेजवरील SSC परीक्षा निकाल 2021 लिंकवर क्लिक करा.
3.एक नवीन पेज स्क्रीनवर दिसेल.
4.आपल्या रोल नंबरसह मागितलेली अन्य माहिती येथे भरा.
5.सबमिट वर क्लिक करा.
6.आता SSC निकाल 2021 आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

महत्वाच्या घडामोडी –

“फडणवीसांनी संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच संपेल”

शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना ‘व्हिप’ जारी

“आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते”

पंतप्रधान मोदी आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here