Home देश महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव; शिवसैनिक कर्नाटक पोलिसांना भिडले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव; शिवसैनिक कर्नाटक पोलिसांना भिडले

शिनोली : बेळगाव महानगरपालिकेच्या समोर शिवसेनेचा झेंडा फडकवणाराच असा निर्धार करून कोल्हापूरातील शिवसेनेचा मोर्चा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिनोली गावाजवळ येऊन थडकला आहे. पोलिसांचा बंदोबस्त झुगारून आम्ही जाणारच, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

28 डिसेंबर रोजी महानगरपालिका कार्यालयासमोर काही काही कन्नड लोकांनी बेकायदा लाल-पिवळा ध्वज फडकवला. त्यामुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली होती.

म.ए.समितीने जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांची भेट घेऊन 21 जानेवारीच्या आत बेकायदा लाल-पिवळा ध्वज हटवावा, अन्यथा विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार शहरांत आणि गावोगावी जनजागृती करण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे जिल्हा प्रशासन दचकून गेले होते.

महत्वाच्या घडामोडी-

इथे तांडव का नाही?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला सवाल

“पराभव मान्य करा नाहीतर लोकंच तुडवतील एक दिवस”

…त्यामुळे मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे- जयंत पाटील

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी