Home महाराष्ट्र राज्यात दिवाळीनंतर मंदिरं सुरू होणार- राजेश टोपे

राज्यात दिवाळीनंतर मंदिरं सुरू होणार- राजेश टोपे

मुंबई : राज्यात मंदिरे दिवाळीनंतर सुरू करण्यास राज्य सरकार अनुकूल आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यत फारच कमी आहे. तरीही राज्य सरकारने याबाबतची पूर्ण खबरदारी घेतली आहे. तसेच दिवाळीनंतर राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे., असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, दिवाळी ताेंडावर असून लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. तसेच लाॅकडाऊन शिथिल केल्याने आणि त्यामध्ये आणखी सवलती देण्याची तयारी सरकारने केल्याने राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे., याच पार्श्वभूमीवर राजेश टोपेंनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अजिंक्य रहाणे-शिखर धवनची शानदार अर्धशतके; दिल्लीची बेंगलोरवर 6 विकेट्सनी मात

देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला वाचव; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला

“एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा तिरस्कार कमी करावा”

…कराण मुख्यमंत्री स्वत: बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात; निलेश राणेंची टीका