खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

0
183

मुंबई : खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

मी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी तासन् तास बैठका घ्याव्या लागल्या. एवढ्या बैठका करोनाविरोधातली लढाई लढण्यासाठी घेतल्या असत्या तर महाराष्ट्राची आज ही अवस्था झाली नसती, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सरकारला आम्ही मदतच करतो आहोत. मात्र सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“त्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…”

सोनू सुद जर यूपीमध्ये असता तर योगी सरकारने…; यूपी काँग्रेसचा योगी सरकारवर निशाणा

भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जयंत पाटलांचा सवाल

“…तर ठाकरे सरकारने 6 महिने पुर्ण केले या आनंदात विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवन घालता आले असते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here