Home महाराष्ट्र “तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत”

“तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत”

मुंबई : देशभरातील जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंत केवळ 30-40 टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल. आतापर्यंतचे निकाल एनडीएच्या बाजूने लागले आहेत. परंतु मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे, तर राजदच्या तेजस्वी यादव यांनी एनडीएला जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत., असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, तेजस्वी यादव यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलंच पाहिजे कारण, कधी कधी एखादा संघ हरतो, परंतु पराभूत संघातील एक खेळाडू संपूर्ण टीमला पुढे घेऊन जातो, संघर्ष करतो, जिंकण्यासाठी ताकद पणाला लावतो. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या संघर्षामुळे या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलं पाहिजे.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल”

“देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यांनेच बिहारमध्ये भाजपला यश”

“काँग्रेस म्हणजे बुडते जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल म्हणजे ट्रेलर”

नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे- पृथ्वीराज चव्हाण