आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दुबई : टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना झाला या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला. वनडे आणि टी20 विश्वचषकातील हा पाकिस्तानचा भारताविरुद्धचा पहिलाच विजय ठरला आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 17.5 षटकात पूर्ण केले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामी जोडीने शानदार सुरुवात करत आपली विकेट जाऊ न देता भारतीय गोलंदाजांवरील वर्चस्व कायम राखले आणि या दोघांनी आपली वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. आणि अखेर पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र, भारताला पहिला धक्का पहिल्याच षटकात बसला. शाहिन आफ्रिदीने चौथ्या चेंडूवर रोहित शर्माला शुन्यावर पायचीत केले. तर दुसरा धक्काही लवकर दिला. तिसऱ्या षटकात केएल राहुलला त्याने 3 धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधार विराटला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तोही फार काळ टिकू शकला नाही.
हे ही वाचा : संजय राऊतांना भाजप नावाची कावीळ झालीये; प्रवीण दरेकरांचा टोला
रिषभ पंतने विराटला चांगली साथ दिली आणि भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. हे दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले असतानाच शादाब खानने पंतला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. पंत 30 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा करुन बाद झाला.त्यानंतर रविंद्र जडेजाने विराटला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, रविंद्र जडेजाला हसन अलीने 13 धावांवर 18 व्या षटकात बाद केले.
दरम्यान, विराटने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण, विराटचा अडथळा 19 व्या षटकात शाहिन आफ्रिदीने दूर केला. विराट 49 चेंडूत 57 धावा करुन रिझवानकडे झेल देऊन बाद झाला. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्या 11 धावांवर हॅरिस रौफच्या विरुद्ध बाद झाला. अखेर भुवनेश्वर 5 धावंवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हसन अलीने 2 विकेट्स घेतल्या. तर, हॅरिस रौफ आणि शादाब खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
सत्तेसाठी काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करू नये’; भातखळकरांची संजय राऊतांवर टीका
खासदाराला साधा अर्जही भरता येत नाही; गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला
राष्ट्रवादीकडून भाजपला दिवाळीचे फटाके; भाजपात गेलेले नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार?