Home क्रीडा “टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, कृणाल पांड्यानंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा”

“टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, कृणाल पांड्यानंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा”

कोलंबो : टीम इंडियाच्या मागे लागलेलं विघ्न थांबायचं नावच घेत नाहीये. टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता आणखी 2 भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर मालिकेतील दोन टी-20 सामने शिल्लक असताना कृणालसह आणखी 7 खेळाडूंना सुरक्षेचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. या विलगीकरणातील 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम अशी असून दोघांनाही वेगवेगळ्या विलगीकरणात ठेवले असून मेडिकल टीम त्यांची काळजी घेत आहे.

दरम्यान, कृणालला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जात होती. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या कोरोना टेस्टमध्ये चहल आणि गौतम दोघेही कोरोना निगेटिव्ह आढळले होते. मात्र आज (शुक्रवारी) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये दोघांच्या कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मदत म्हणा किंवा पॅकेज म्हणा पण तात्काळ घोषणा करा; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा योग्य मान सन्मान केला जाईल; गुलाबराव पाटलांची थेट ऑफर

‘या लोकांना महत्व देण्याची गरज नाही’; आमदार रोहित पवारांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला