Home क्रीडा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

असा असेल भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंडमधील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल ही इंग्लंडच्या साउथ्मपटन स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन स्टेडियम, इंग्लंड

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट; भाजप नेत्याच्या या वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, फडणवीसांनी ते दिले, तेही सरकारला टिकवता आले नाही”

आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव- सचिन सावंत

“ज्या पतीला वाचवण्यासाठी लता करे अनवाणी धावल्या, त्या पतीला कोरोनानं हिरावलं”