उस्मानाबाद : माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांचं आज पहाटे निधन झालं. ते 90 वर्षांचे होते.
गेल्या बऱ्याच काळापासून आलुरे गुरुजी आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरच्या अश्विनी रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. बीडमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर ते मुख्याध्यापक झाले. त्यानंतर 1990 साली ते निवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रात काम करता असताना त्यांना राजकारणात देखील रस होता.
दरम्यान, 1980 साली त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली. 1980 साली त्यांनी शेकापचे तत्कालिन आमदार माणिकराव खपले यांचा पराभव केला आणि ते आमदार झाले. तसेच आमदार निधीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी गरिब मुलांसाठी वसतीगृह बांधली. तर शिक्षक आणि आमदार निधीतून मिळाणाऱ्या पैशातून त्यांनी दलित मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली. तसेच मराठवाड्याचे साने गुरूजी अशी त्यांची ओळख होती.
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे…; विजय वडेट्टीवारांचा टोला
“शरद पवारांमुळेच मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली”
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागली”
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं; देवेंद्र फडणवीसांचा दावा