शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार- वर्षा गायकवाड

0
173

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांनाच पडला होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

दरम्यान, तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे तसंच त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल- प्रविण दरेकर

सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं; शिवसेनंचं राणेंना खुलं आव्हान

ठाकरे सरकारची ठोकशाही सुरु आहे; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here