टाटा ट्रस्ट करणार पुन्हा देशाची मदत; आता देणार ‘इतक्या’ रुपयांचा निधी

0
173

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात देशासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर आता पुन्हा एकदा टाटा ट्रस्टकडून 150 कोटी रुपयांचं वैद्यकीय साहित्य देशभरात एअरलिफ्टच्या माध्यमातून पोहोचवलं जाणार आहे. टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या मदतीनं ही मदत केली जाणार असल्याची माहिती टाटा ट्रस्टनं दिली आहे.

पीपीई किट्स, सर्जिकल मास्क, ग्लोव्ज यासारख्या अत्यावश्यक वस्तू एअरलिफ्ट करण्याचं काम आता टाटा ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये विविध टप्प्यांमध्ये सर्वाधिक आवश्यकता असलेल्या भागांमध्ये हे वैद्यकीय साहित्य पाठवलं जाणार आहे.

दरम्यान, टाटा समूहानं याआधीही कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी 1500 कोटींचा निधी दिला आहे, त्यानंतर आता पुन्हा एकदा टाटा देशाच्या मदतीला धावले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरेंविरुद्ध गुन्हा केव्हा दाखल होणार?; किरीट सोमय्यांचा सवाल”

लॉकडाऊनच्या काळात शालेय शुल्क भरण्याची सक्ती करू नये- वर्षा गायकवाड

राज्यसरकारविरुद्ध पंकजा मुंडे आक्रमक; उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!

“अजित पवारांचं पालकमंत्र्यांना पत्र; म्हणतात…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here