तासगाव तालुक्यातून घडलेले नेतृत्व आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडत कोल्हापूर आणि सांगली महापालिकेत प्रभावीपणे आपली छाप उमटवत आहे.
गावाशी घट्ट नाळ जपत शहराच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या या नेत्यांनी “स्थानिक ते महानगर” असा यशस्वी प्रवास केला आहे.
कोल्हापूर महापालिकेत तासगावची दमदार एन्ट्री-
नगरसेवक श्री शारंगधर देशमुख (खुजगाव) वार्ड क्र ९
कोल्हापुरातील गाजलेले आणि प्रभावी धुरंधर नेतृत्व म्हणून शारंगधर देशमुख यांची ओळख निर्माण झाली आहे. नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी माजी स्थायी सभापती म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. सध्या ते शिवसेनेचे गटनेते असून भविष्यात महापौरपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे तसेच मंत्री प्रकाश अबिटकर यांच्याशी त्यांचा थेट संपर्क असून ते धडाडीचे आणि प्रभावी नेतृत्व मानले जातात.
कोल्हापुरातील अनेक उद्योग, शैक्षणिक संस्था यामध्ये ट्रस्टी म्हणून त्यांचा सहभाग आहे. व्यावसायिक क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. राजकीय वर्तुळात देशमुख हे भविष्यात भावी आमदार होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.
प्रा. श्री जयंत पाटील (येळावी)-:कोल्हापूर महानगरपालिकेतील चार वेळा स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रा. जयंत पाटील यांची ‘कोल्हापुरातील चाणक्य’ अशी ओळख आहे. जिल्हा बँकेचे माजी व्हाइस चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचे मा आ. महादेव अप्पा महाडीक मा मंत्री विनय कोरे मंत्री हसन मुश्रीफ,मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच खासदार धनजय महाडीक यांच्याशी सलोख्याचे आहेत.
मूळ गाव येळावीशी आजही त्यांची नाळ घट्ट असून गरजूंसाठी मदतीचा हात देणारे ‘ज्याला कोणी नाही त्याला सर आहेत’ अशी त्यांची ख्याती आहे. भविष्यात एखाद्या महत्त्वाच्या महामंडळाच्या पदाचे ते दावेदार मानले जात आहेत.
🔹 सांगली महापालिकेतही तासगावची मजबूत पकड
सौ. सोनल पाटील (सावर्डे) वार्ड क्र १५-:सांगली महापालिकेत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सोनल पाटील या सावर्डे गावच्या आहेत. त्यांचे पती विक्रमसिंह पाटील हे माजी नगरसेवक असून स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा संपर्क आहे. ते वसंतदादा साखर कारखाण्याचे संचालक राहिले आहेत.
फौजदार गल्ली, भोसले तालीम परिसरात त्यांची मजबूत पकड असून सावर्डेकर, माने-पाटील कुटुंबांची मोठी संख्या त्यांच्या पाठिशी आहे.
त्या काँग्रेसमधून निवडून आल्या असून माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी नाते तसेच खासदार विशाल पाटील यांचे विश्वासू म्हणून त्यांचा समावेश आहे.
विक्रम पाटील यांचा शेती, ट्रान्सपोर्ट आणि अडत व्यवसाय असल्याने सामाजिक व आर्थिक दोन्ही पातळ्यांवर त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
सौ. अंजली जाधव (खुजगाव) वार्ड क्र ११-:सांगली महापालिकेच्या वार्ड क्रमांक ११ मधून काँग्रेसकडून निवडून आलेल्या अंजली जाधव या खुजगावच्या आहेत. त्या अजित जाधव यांच्या पत्नी असून स्थानिक पातळीवर जाधव कुटुंबाची मोठी ताकद आहे.
चिंतामणीनगर, साईनगर, कारखाना परिसर, संजयनगर, यशवंतनगर या भागात त्यांचा प्रभाव दिसून येतो. वार्ड क्रमांक ११ मधील जाधव कुटुंबाचा मोठा वाटा त्यांच्या विजयामागे राहिला असून, खुजगावातून उभी राहिलेली मजबूत यंत्रणा त्यांच्या प्रचाराला मोठे बळ देणारी ठरली.
अजित जाधव हे खासदार विशाल पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते असून ते व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत.
स्थानिक मतदारांशी असलेली घट्ट नाळ आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळेच त्यांच्या विजयात निर्णायक भूमिका राहिली.
तासगाव तालुक्यातील ही नेतेमंडळी आज कोल्हापूर आणि सांगली महापालिकेत आपली मजबूत उपस्थिती नोंदवत आहेत. गावपातळीवर घडलेले नेतृत्व आता शहराच्या राजकारणात निर्णायक ठरत असून भविष्यात जिल्हा आणि राज्य पातळीवरही या नावांचा प्रभाव वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
तासगावचा हा वाढता राजकीय डंका येणाऱ्या काळात आणखी मोठा आवाज करणार, यात शंका नाही!
-: निखिल जाधव.

