Home महाराष्ट्र ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद

ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद

सातारा : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर घडली आहे. जिथं ऑक्सिजनवरुन दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजनचा टँकर अडवला. यावरुन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाला. ऑक्‍सिजनचा टँकर आमचाच असल्याचा दावा कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

तुम्ही हे वाचलंत का?

राज्य पुण्यातून चालवा अथवा… ; चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना पुन्हा डिवचलं

दरम्यान, ऑक्सिजन टँकरवरुन वाद झाल्यानंतर फोनाफोनी केल्यानंतर तो टँकर सातारचा असल्याचे स्पष्ट झालं आहे. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाली असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरुन दिली. तर संबधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबध नाही. तो टँकर कोल्हापुरातल्या प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील ऑक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी TNS या कंपनीकडून स्वतंत्र टँकर येत आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

“देवों का देव महादेव फेम अभिनेता मोहित रैनाला कोरोनाची लागण”

पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत- निलेश राणे